थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार
देश बातमी

थायलंडहून बोलावली कॉल गर्ल; 2 दिवसांनी करावे लागले भारतातच अंत्यसंस्कार

उत्तर प्रदेश : कोरोनाचे भारतात अक्षरशः तांडव सुरु आहे. अशात उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने 10 दिवसांपूर्वी 7 लाख रुपये खर्च करुन थायलंडमधून बोलावलं होतं. 2 दिवसानंतर ती आजारी पडली. त्यानंतर तिला लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि तिचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी आधी थायलंड एम्बसीसोबत संपर्क केला आणि तरुणीच्या कुटुंबीयांना डेडबॉडी हँडओव्हर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे होत नसल्याने शनिवारी एजन्ट सलमान याच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या एजन्टच्या माध्यमातून ती भारतात आली होती.

कॉल गर्लच्या मृत्यूनंतर आता पोलीस राजधानीत पसरणाऱ्या या इंटरनॅशनल सेक्स रॅकेटबाबत माहिती गोळा करीत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, या कॉल गर्लच्या संपर्कात कोण कोण आलं होतं, त्याचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कॉल गर्ल राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका ट्रॅव्हल एजंटच्या संपर्कात आली होती. त्यानेच तिला लखनौला पाठवलं होतं. पोलिसांनी आता या एजन्टचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात आलेल्या माहितीनुसार या व्यापाऱ्याच्या मुलाने कॉल गर्लची तब्येत बिघडल्यामुळे स्वत: थायलँड एम्बसीला फोन करुन याबाबत माहिती दिली होती. यानंतर एम्बसीने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केलं.