मध्यप्रदेशात निवडणुकीत कोरोना होऊन १७ शिक्षकांचा मृत्यू
देश बातमी

मध्यप्रदेशात निवडणुकीत कोरोना होऊन १७ शिक्षकांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक ठिकाणी निर्बंधासह लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र राजकीय मंडळीचं कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान १५ शिक्षक कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर शेकडो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. असाच प्रकार मध्य प्रदेशात देखील समोर आला आहे. दमोहमधील पोटनिवडणूक लोकांसाठी प्राणघातक ठरली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील ८०० शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी २०० शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर कोरोनाने गाठले. तर ड्युटीवर असलेल्या कमीतकमी १७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये शिक्षक, राजकारणी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबानी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

दमोह येथील ५८ वर्षीय सरकारी शिक्षक, ब्रजलाल अहिरवार यांनाही पोटनिवडणुकीवर तैनात करण्यात आले होते. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. माझ्या वडिलांची इच्छा होती की विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, परंतु पीपीई किट मिळाल्यामुळे कोविड होऊ शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. दोन दिवसांनी ते परत आले. त्यांना ताप आला आणि ५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दुसर्‍याच दिवशी, त्यांची ५१ वर्षीय पत्नी प्यारीबाई यांचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे मुलगा रोहितने सांगितले. पोटनिवडणूक कर्तव्यावर सामील झाल्यानंतर कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या १७ शिक्षकांची दमोह प्रशासनाने यादी केली आहे.