मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसकडून चौकशी सुरु
बातमी मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसकडून चौकशी सुरु

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणी आता एटीएस’ने कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसांच्या फोन आला होता आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, मग ते गेले ते घरी परत आलेच नाही. त्यामुळे कांदिवली क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

तर रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी असून ते देखील API आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. तसेच सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तपासात NIA ने प्रथम अँटिलीयानजीक सापडलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी सीपी कार्यालयातून ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक काळया रंगाची मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर काल ठाण्यातून प्रॅडो कार जप्त केली. आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.