ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर  निशाणा
राजकारण

ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा; राज ठाकरेंचा राज्यसरकारवर निशाणा

मुंबई : ”राज्याच्या गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे, त्यामुळं सरकारनं तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद […]

उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
राजकारण

उद्धव ठाकरे हेच सचिन वझे यांचे गॉडफादर; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप

मुंबई : सचिन वझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा नेते […]

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसकडून चौकशी सुरु
बातमी मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसकडून चौकशी सुरु

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणी आता एटीएस’ने कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांची एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह […]

आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
बातमी मुंबई

आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. अशी माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर द्द्वारे दिली आहे. त्याचबरोबर, रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त […]

सचिन वझें’चा  मोठा खुलासा; ती कार मीच चालवत होतो
बातमी महाराष्ट्र

सचिन वझें’चा मोठा खुलासा; ती कार मीच चालवत होतो

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी दिली आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? […]

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला
राजकारण

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई : सचिन वझे यांच्या विरोधात दररोज नवनवीन पुरावे समोर येत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षाने सचिन वझे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना अटक करत तपास सुरु केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत असल्यामुळे ठाकरे […]

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त
बातमी महाराष्ट्र

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सचिन वझे यांच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयए’ने सचिन वझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. वझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात […]

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर
राजकारण

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जयंत पाटलांचे भाजपा नेत्याला प्रत्युत्तर

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवसाथानाबाहेर एका कारमध्ये स्फोटक सापडली. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांचा सहभाग, मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं होतं. विरोधी पक्षाही विधानसभेत चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या सर्व प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा घेतला […]

एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन
बातमी मुंबई

एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार काही दिवसांपूर्वी आढळून आली होती. या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय तपासा यंत्रणा (एनआयए)कोठडी सुनावली आहे. एनयाएच्या या कारवाईनंतर आता सचिन वझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ […]

सचिन वझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी; वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

सचिन वझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी; वाचा सविस्तर

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करत न्यायालयात हजर केले. या प्रकरणी न्यायालयाने सचिन वझे यांना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएने सचिन वझे यांची १४ दिवसांसाठी कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी […]