अभिषेक बच्नन इज बॅक; The Big Bullचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

अभिषेक बच्नन इज बॅक; The Big Bullचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट द बिग बुल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाच ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ३ मिनिट ८ सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला इस देश मैं हम कुछ भी कर सकते है असे बोलताना दिसत आहे. चित्रपटातील अभिषेकचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच चित्रपटात इलियाना डिक्रूज एका महिला पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये हर्षद मेहता यांचा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण ते भारतातील सर्वात मोठा स्टॉक इन्व्हेस्टर होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच विषयावर गेल्या वर्षी स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली होती.