बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
पुणे बातमी

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. शरद पवारांचे विरोधक म्हणून त्यांची ओळख होती.

काकडे यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली! अशा भावना शरद पवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत.