पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं वाढलं भाडं
बातमी महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; रिक्षा आणि टॅक्सीचं वाढलं भाडं

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे संकटात वाढ होताना दिसत आहे. परिणामी मुंबई एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचं भाडं 18 वरुन 21 रुपयांवर होणार आहे. टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आज परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिजेलच्या किंमतीत वाढ होत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेला याचा फटका बसत आहे. या इंधन वाढीच्या निर्णयावर रिक्षा व टॅक्सी चालकांकडून आंदोलन पुकारण्यात येणार होते. मात्र आता भाड्यात वाढ करुन दिल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना या फटका सहन करावा लागणार आहे. आधीच कोरोनाचं संकट त्यात पेट्रोल-डिजेल भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे वाढ केल्याने सर्वसामान्यांचा खिशाला फटका सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, अनेक शहरांत पेट्रोल शंभरीला पोहोचलं आहे. एका बाजूला इंधनाच्या वाढत्या किमतींवरून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत असताना कच्च्या तेलाचे दर का वाढत आहेत याचं स्पष्टीकरण मोदी सरकार द्यायचा प्रयत्न करत आहे. यावर थोडा दिसाला म्हणून काही राज्यांनी करात घट करत पेट्रोलचे भाव काही प्रमाणात आटोक्यात ठेवायचा प्रयत्न सुरू केला आहे.