मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस
देश बातमी

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्पुटनिक व्ही लस भारतात आली आहे. मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, पुढच्या आठवड्यापासून ही लस भारतात मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लशींची लवकरच विक्री सुरु होईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं आहे.

स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाण व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या लसीचं उत्पादन जुलै महिन्यात सुरु होईल असंही वीके पॉल यांनी सांगितलं. या लशीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील.