दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण; सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य उघड
देश बातमी

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण; सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य उघड

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर झालेल्या हा ब्लास्टमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही माहिती उघड झाली आहे. येथून जाणाऱ्या एका कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं. ज्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. या स्फोटामुळे तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सायंकाळी तब्बल 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाला. तपास यंत्रणा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेच तपासत आहे. या फुटेजवरुन स्फोटाच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाच्या जवळून एक कार गेली होती. या कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं होतं. रस्त्यावर झाडांजवळ जाऊन हे पॅकेट पडलं आणि काही वेळात स्फोट झाला. स्फोटासाठी वापरण्यात आलेलं सामान दिल्लीतील लोकल मार्केटमधून खरेदी करण्यात आलं होतं. कारवर बॉल बेअरिंगचे निशाण सापडले आहे. याच्या आधारावर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य दिल्लीतून खरेदी करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा आईडी ब्लास्ट होता, मात्र स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. म्हणजे यामध्ये ज्या विस्फोटकांचा वापर केला होता, त्याचं प्रमाण वा त्याची इंटेसिंटी जास्त नव्हती. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्ब स्फोट झाला. विजय चौकवर बिटिंग रिट्रिट या सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित आहेत. आईडीच्या स्वरुपातील ही स्फोटकं प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाड्यांच्या काचा फुटल्या.