कोरोनामुळे भाजप खासदाराचे दिल्लीत निधन
देश बातमी

कोरोनामुळे भाजप खासदाराचे दिल्लीत निधन

भोपाळ – मध्य प्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे दिल्लीत निधन झाले आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात आज (ता. ०२) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नंदकुमार सिंह चौहान यांचा मुलगा हर्षवर्धन चौहान यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. नंदकुमार सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातूनच त्यांची प्रकृती खालावत गेली. खंडवा मतदारसंघातील खासदार आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान जवळपास 1 महिन्यापासून दिल्लीतील रुग्णालयात होते. 11 जानेवारीला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर भोपाळमधील रुग्णालयात उपाचर सुरु होते.

प्रकृती जास्तच खालावल्याने नंदकुमार सिंह चौहान यांना दिल्लीत मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. चौहान यांचे पार्थिव दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने खंडवा इथं आणलं जाईल. त्यानंतर बुरहानपूर इथल्या त्यांच्या शाहपूर गावामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.