शिवजयंती साजरी करा; पण महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणेच
बातमी महाराष्ट्र

शिवजयंती साजरी करा; पण महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणेच

मुंबई : कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा ” शिवजयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवजयंती महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘या’ मार्गदर्शक सूचनांनुसार शिवजयंती साजरी करण्याला परवानगी
– छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनामुळे यंदा साधेपणानं साजरी करावी.

– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं. या सूचनांशिवायही दरम्यानच्या काळात आणखी काही सूचना लागू झाल्यास त्यांचंही अनुपालन करावं.

– बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी प्रभातफेरी, ; महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन बंधनकारक असेल.

– गड – किल्ल्यांवर न जाता घरी बसूनच शिवजयंती उत्सव साजरा करावा. अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी किंवा अनेक गड- किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार 18 तारखेला मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. पण, यंदा हे सारं टाळावं

– सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचं आयोजन ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करावी.

– 10 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास मत्र परवानगी असेल. पण, तिथंही नियमांचं पालन बंधकारक असेल. आरोग्य विषयक कार्यक्रमांचं आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्क, सॅनिटायझरचा वापरही करण्यात यावा.