हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही
देश बातमी

हा शेतकऱ्यांच्या सन्मानाचा विषय; या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही

नवी दिल्ली : “सरकार जर हट्टाला पेटलं असेल तर आम्हीही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. शेतकरी कायद्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या सन्मानाशी निगडीत विषय आहे. अशावेळी या कायद्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. सरकारने कायद्यात बदल करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. पण कायदे पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी आहे” , असं भारतीय शेतकरी युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी आंदोलकांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद’ला देश्भारातीन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनासोबातच कालच्या बंदही चांगलाच आक्रमक होता. त्यानंतर अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली. यावेळी नव्या कृषी कायद्यांमध्ये बदल करण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती समोर आली. मात्र केंद्राने सुचविलेल्या बदलांसाठी शेतकरी उत्सुक नसून हे कायदे पूर्णपणे रद्द करण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्येही सिंघू सीमेवर बैठक झाली. सरकारच्या या प्रस्तावावर आता शेतकरी संघटना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात शेतकरी अजूनही कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. काल झालेल्या भारत बंदनंतर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विविध संघटनांचे 13 शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. या शेतकरी नेत्यांमध्ये 8 नेते हे पंजाबमधील होते तर देशभरातून विविध संघटनांचे आलेल्या 5 नेत्यांचा त्यात समावेश होता. अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाशही उपस्थित होते.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 14 दिवस आहे. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये एकूण 5 बैठका पार पडल्या आहे. मात्र त्यातून काही तोडगा निघालेला नाही. दरम्यान काल शेतकरी नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार भारत बंद पुकारण्यात आला. या बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. व्यापारी प्रतिष्ठान, APMC मार्केट बंद ठेवण्यात आले होते. रस्ते वाहतुकीवरही या बंदचा काहीसा परिणाम पाहायला मिळाला. काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडल्याचं पाहायला मिळालं.