एलपीजीचे दर भडकले; पाहा आजपासूनचे नवीन दर
देश बातमी

एलपीजीचे दर भडकले; पाहा आजपासूनचे नवीन दर

नवी दिल्ली : आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर जवळपास ५५ रुपयांनी वाढला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजीही महाग झालेला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्यावसायिक सिलिंडर महाग (शहराप्रमाणे)
चेन्नई – ५६ रुपयांनी वाढून त्याची किंमत १४१० रुपयांवर गेली आहे.
दिल्ली – ५५ रुपयांनी वाढून त्याची किंमत १२९६ रुपयांवर गेली आहे.
कोलकाता – ५५ रुपयांनी वाढून त्याची किंमत १३५१.५० रुपयांवर गेली आहे.
मुंबई – ५५ रुपयांनी वाढून त्याची किंमत १२४४ रुपयांवर गेली आहे.

दरम्यान, जुलैमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४ रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी जूनमध्ये दिल्लीमध्ये १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर ११.५० रुपयांनी महागला. तर मे महिन्यामध्ये ते १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला होता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्लीतील सिलिंडर्सच्या किंमतीत बदल झालेला नाही. दिल्लीत १४.२ किलो अनुदानित गॅस सिलिंडर फक्त ५९४ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत अनुदानित सिलिंडरची किंमत ५९४ रुपये असेल. याशिवाय चेन्नईमध्ये ६१० रुपये प्रति सिलिंडर किंमत असून कोलकातामध्ये या गॅस सिलिंडरची किंमत फक्त ६२० रुपये असेल.