सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर
राजकारण

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर विचारसरणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, ” मी जन्माने आणि कर्माने हिंदूच आहे. अगदी लहानपणापासून मी हिंदू धर्माविषयी अभ्यास करत आली आहे. देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही. पण मी गरज पडेन तेव्हा धर्मानुसारच वागेन.”

तसेच, सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. त्यामुळे मला हिंदू धर्माविषयी पुरेशी जाण आहे. असेही उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले.”

बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत बोलताना त्या उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, ” बॉलिवूड इंडस्ट्रीने स्वत:च्या बचावासाठी उभे राहिले पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही उभे राहा, मग आमच्यासारखे पक्ष तुमच्या पाठिशी उभे राहतील. बॉलिवूड इंडस्ट्री म्हणजे केवळ तीन-चार कलाकार नाहीत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक मेहनती असतात. एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे कोट्यवधी रुपये गुंतल्यामुळे त्यांना बऱ्याचदा बोलता येत नाही, त्यांची कोंडी होते, याकडे उर्मिला मातोंडकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेतील प्रवेशाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ”रश्मी ठाकरे तर सोबत आहेतच पण उद्धव ठाकरेंनीदेखील मला फोन केला होता. यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट बोलली होती. ती म्हणजे, ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्यामुळे विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. या जागा आणि भवनांपर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे याचा दर्जा कुठेतरी वाढवला गेला पाहिजे. त्याकरता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.’ असं उद्धव ठाकरेंनी फोनवर म्हटल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.