मोठी बातमी : महाराष्ट्रातील मोठ्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल
उत्तर महाराष्ट् बातमी

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मोठ्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जानेवारी २०१८मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल ८ डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.