INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात
क्रीडा

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ २४४ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर केवळ ११ धावांची भर घालून भारतीय संघाने ४ फलंदाज गमावले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताने ६ गडी बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी भारताचे तळातले फलंदाज काय करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतू स्टार्क आणि कमिन्स यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाची डाळ शिजू शकली नाही. भारताचे शेवटचे ४ फलंदाज २५ चेंडूत अवघ्या ११ धावा काढून माघारी परतले.

दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात कमिन्सने रविचंद्रन आश्विनला टीम पेनकरवी झेलबाद करत माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंदाज माघारी परतत राहिले. ६ बाद २३३ वरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केलेल्या भारतीय संघाची सुरुवात अवघ्या काही मिनीटांमध्ये ९ बाद २४० अशी झाली. कमिन्सने अखेरीस शमीला बाद करत २४४ धावांवर भारताचा पहिला डाव संपवला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४, पॅट कमिन्सने ३ तर हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी घेतला.

कांगारूंनी खेळाला सुरुवात केली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ९ षटकांचा खेळ समाप्त झाला होता. त्यावेळी कांगारुंनी बिनबाद १० धावा केल्या होत्या.