दिलासादायक ! या औषधामुळे कोरोनाग्रस्तांना मिळणार संजीवनी
देश बातमी

दिलासादायक ! या औषधामुळे कोरोनाग्रस्तांना मिळणार संजीवनी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. मात्र डीआरडीओच्या औषधामुळे कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज आता कमी होणार असून त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन अँड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे तयार केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या औषधाला 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव दिलं आहे. डीआरडीओने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. तसेच या औषधाच्या निर्मितीची जबाबदारी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला देण्यात आली आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं आहे. ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली होती. ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजन गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलं आहे. रुग्णही लवकर बरे होत असल्याचं समोर आलं आहे.

https://twitter.com/DRDO_India/status/1390961209776623618

दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वाधिक गरज ऑक्सिजनची असते. पण या औषधांमुळे आता ती गरज कमी होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.