28 वर्षानंतर भारतीय संघात खेळणार पारसी खेळाडू
क्रीडा

28 वर्षानंतर भारतीय संघात खेळणार पारसी खेळाडू

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात गुजरातच्या अर्जन नागवासवालाने स्थान मिळवले. तो स्टँडबाय खेळाडू म्हणून इंग्लंडला जाईल. त्याच्यापूर्वी रुसी जीवनभोई यांनी राखीव विकेटकीपर म्हणून वेस्ट इंडीज दौरा केला होता. तसेच फारुख इंजिनियर १९७५मध्ये पदार्पण करत शेवटचा सामना १९९३मध्ये खेळला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता अर्जन नागवासवालाने तब्बल ४६ वर्षांनी पारसी क्रिकेटपटू म्हणून टीम इंडियात एन्ट्री घेतली आहे. तर २८ वर्षानंतर भारतीय संघात पारसी खेळाडू खेळणार आहे.

वलसाड जिल्ह्यात नारगोल खेड्यातील रहिवासी असलेल्या अर्जनने २०१८मध्ये बडोद्याविरूद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एका डावात ५ विकेट घेत तो चर्चेत आला. अर्जनने गुजरातसाठी १६ प्रथम श्रेणी, २० लिस्ट-ए आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत.