दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट; पाच दहशतवाद्यांना अटक
देश बातमी

दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट; पाच दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये घातपाताच कट उधळून लावत पाच दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पाच जण इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे. दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर या पाचही दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. यामधील दोन जण पंजाब तर तीन जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे. या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

त्याचबरोबर, रविवारी कुपवाडा येथील गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून 5 किलो स्फोटकं, 2 डेटोनेटर्स आणि 2 पोस्टर्स हस्तगत केली आहेत. त्यामुळे पुढे होणार घातपात टळला आहे. सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती कुशवाहा यांनी सांगितले.