धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोनाबाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.’ अशा आशयाचे ट्विट मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केले आहे.

गेल्या वर्षी १२ जूनला मुंडे यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनाही ही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना वर्षा या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.