खडसे साहेब, ‘आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’
वायरल झालं जी

खडसे साहेब, ‘आमचा बाजार उठवल्यावर सीडी लावणार का?’

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर सारख्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादीला हैरान करून सोडले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित १०० कोटींच्या वसुलीच्या पत्रावरून तर राष्ट्रवादीसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिली आहे. तरी कुठेतरी शरद पवार हे अस्वस्थ असल्याचे दिसत आहेत. हाच मुद्दा धरून नेटकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या एक मीम सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूर्वी भाजपमध्ये असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी ईडीकडून धमकी मिळत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. भाजप सोडताना त्यांनी तुमच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडे सीडी आहे असा इशारा भाजपला दिला होता. माझ्याकडे असलेल्या सीडीमध्ये अनेक कारनामे दडलेले आहेत, योग्य वेळ आली की ती सर्वांसमोर मांडेल अशी घोषणा खडसेंनी त्यावेळी केली होती.

पण आता राष्ट्रवादी संकटात असतानाही खडसे शांत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय पक्षावर होत असलेल्या आरोपांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यातील संभाषणाचा फोटो पोस्ट केला जात आहे. सोबतच विनोदी मजकूर लिहिलेले मीम तयार केले जात आहे.