तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….
देश बातमी

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….

लखनऊ : तुमच्या कोणत्याही वाहनांवर जर एखादा जातीवाचक शब्द लिहिलेला असेल तर तो लगेच काढून टाका. नाहीतर तत्काळ हटवा, अन्यथा तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्या गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपूत, मौर्य, जाट यांसारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केलेला असेल तर तुमची गाडी जप्तही केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने जातिसूचक शब्दांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणाचा अवलंब केलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युपी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची नंबर प्लेट चुकीच्या आकाराची आणि आकडे आडवे-तिडवे लिहिलेले आढळलयास पाच हजार रुपयांपर्यंत दंड तर जातिसूचक शब्द लिहिलेले आढळल्यास आरोपीवर कलम १७७ नुसार कारवाई केली जाईल. तसेच, हा गुन्हा करताना पहिल्यांदा आढळल्यास ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा आढळल्यास १५०० रुपयांपर्यंत दंडांपर्यतची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारला उत्तर प्रदेशातील राजकारण आणि सामाजव्यवस्थेत जातीवाद फोफावला असल्याच्या वारंवार तक्रारी मिळत होत्या. आपली जात वरिष्ठ आणि इतरांची जात कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्नात उत्तर प्रदेशात गाड्यांवर जातीय उल्लेखा केला जात होता. त्यामुळे तेथील जातीयवाद वाद वाढीस लागल्याचा आरोपही होत होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला यावर बंदी आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून निर्देश मिळताच उत्तर प्रदेश सरकारनं गाड्या जप्त करण्यासोबतच इतर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आता मोटार वाहन कायद्यानुसार, गाडीच्या नंबर प्लेटवर नंबरशिवाय आणखी काहीही लिहिलेलं आढळल्यास परिवहन विभाग अशा गाड्यांविरुद्ध आणि त्या गाड्यांच्या मालकांविरुद्ध योग्य ती कारवाई होऊ शकते.