राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे
राजकारण

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे

मुंबई : ”राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,”,’ असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राजकीय टीका-टिप्पणीला वेग आला आहे. या नोटिशीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनीही भाजपा टीकास्त्रसोडले आहे. एका कार्यक्रमाच्या प्रसंगी ‘एएनआय’शी बोलताना आदित्य यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भाजपचे लोकच माहिती देताहेत. कालपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल.”

तर, ”राजकीय सूडभावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांकडे पोहोचवली जाते. त्यामुळे नेत्यांची उगाच बदनामी करायची हा हेतून आह की काय अशी शंका येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

तसेच, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे. ”ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.