डॉ. प्रियंका नारनवरे देशातून अव्वल; मोक्षदा पाटील पाचव्या स्थानावर
देश बातमी

डॉ. प्रियंका नारनवरे देशातून अव्वल; मोक्षदा पाटील पाचव्या स्थानावर

पुणे : राष्ट्रीय पोलीस अकादमीने घेतलेल्या आंबेडकर मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये पुणे पोलीस दलातील पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे या देशात अव्वल ठरल्या आहेत. तर औरंगाबाद पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातून पुणे पोलीस दलातील परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. नारनवरे, मोक्षदा पाटील हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर या तिघांचा सहभाग होता. प्रशिक्षणामध्ये कार्यक्रम निश्चिती नमुना अभ्यासपद्धती यासह विविध प्रकारे प्रशिक्षण घेण्यात आले. नॅशनल पोलीस अकॅडमीचे संचालक अतुल करवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना या प्रशिक्षणाचा निकाल पाठविला. त्यामध्ये डॉ. नारनवरे या ८५.८७ टक्के गुण प्राप्त करून पहिल्या आल्या तर मोक्षदा पाटील यांनी ८२.१० टक्के गुण प्राप्त करीत पाचवा क्रमांक प्राप्त केला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीने १४ जून ते १० जुलै या कालावधीत भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस अधिकाऱ्यांसाठी हैद्राबाद येथे मिड करियर ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित केला होता. पोलीस महानिरीक्षक या पदाच्या भरतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये दिल्ली, तामिळनाडू, बिहार व महाराष्ट्र केडरमधील तब्बल १०४ आयपीएस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.