फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी
बातमी विदेश

फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे, असेही डब्ल्यूएचओ ने म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि इतर देशातील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.
जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे. प्राथमिकता असणार्‍या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते.” मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे.

तथापि, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची आज कोरोना लसीसंदर्भात बैठक आहे. ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे अशा तीन कंपन्यांच्या डेटाचं पुनरावलोकन या बैठकीत होणार आहे. या समितीच्या शिफारशीवर डीसीजीआय निर्णय घेणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे.

यासंदर्भात चार राज्यांमध्ये दोन दिवसांचं ड्राय रनही करण्यात आलं आहे. तर उद्यापासून म्हणजेच 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये एक दिवसाचं ड्राय रन केलं जाईल. सर्वात आधी आरोग्य कर्माचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचाकी आणि त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसंच 50 वर्षांखालील वयाचे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना ही लस दिली जाईल.