दिलासादायक ! डीआरडीओच्या नव्या औषधानं लवकर बरे होणार कोरोना रुग्ण
देश बातमी

दिलासादायक ! डीआरडीओच्या नव्या औषधानं लवकर बरे होणार कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : डीआरडीओकडून मान्यता मिळालेलं २ डायोक्सी डी-ग्लुकोज हे कोरोना प्रतिबंधक औषध पूर्णपणे सुरक्षित असून त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होईल, असे मत वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी आज (ता. ०९) व्यक्त केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हे औषध करोना रुग्ण बरे होण्यामध्ये परिणामकारक ठरत असल्याचं या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, तर तिसऱ्या टप्प्यात २२० रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. नेहमीच्या करोना उपचारांपेक्षा हे औषध वापरुन केलेले उपचार अधिक परिणामकारक असल्याचं समोर आल्याची माहिती डॉ. चंदना यांनी दिली आहे.

ते म्हणाले, या औषधामुळे आत्ताच्या साधारण कालावधीच्या २ ते ३ दिवस आधीच करोना रुग्ण बरा होत आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या दिवशी ४२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. तर साधारण परिस्थितीत तिसऱ्या दिवशी ३१ टक्के रुग्ण ऑक्सिजनमुक्त होतात. साधारण उपचारांसोबत हे औषध वापरल्यास रुग्णाची ऑक्सिजनची गरज कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

कोण आहेत डॉ. सुधीर चंदना?
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेस या प्रयोगशाळेने हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या संयुक्त विद्यमाने हे औषध तयार करण्यात आलं आहे. डॉ. चंदना हे याच प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक आहेत.