एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बस दाखल होणार; 100 शिवाई बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार
बातमी महाराष्ट्र

एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बस दाखल होणार; 100 शिवाई बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार

केंद्राच्या फेम 2 अंतर्गत पुढील दोन महिन्यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. त्यातील 100 शिवाई बसेस मुंबई-पुणेमार्गावर धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस हळूहळू थांबवण्यात येतील. ‘शिवाई’ बसेस या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्राच्या फेम 2 अंतर्गत पुढील दोन महिन्यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. ठाणे-पुणे, दादर-पुणे, नाशिक-पुणे, कोल्हापूर-स्वारगेट, औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवरही शिवाई बस धावणार आहे. ‘शिवाई’ बसचं मुंबई-पुणे प्रवासाचं भाडं 350 रुपये असण्याची शक्यता आहे.

पुढील दोन वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात शिवाई बसेस दाखल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शिवाई धावणार असा एसटी महामंडळाचा विचार आहे. सर्वाधिक चालणाऱ्या मार्गावर शिवाई बस अधिक प्रमाणात चालवल्या जाणार आहे.