अ‍ॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षाच्या मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं जीवन
बातमी मुंबई

अ‍ॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षाच्या मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं जीवन

मुंबईमधील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघर मधील ज्ञानमाता आदिवासी महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे एका विद्यार्थ्याने बाथरूम मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. अ‍ॅलेस विनय लखन असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव होतं.

आलेस लखन हा मूळचा सावरोली उधानपाडा, तलासरी तालुक्यातील आहे. अॅनल्स 11 व्या वर्गात विज्ञानाचा अभ्यास करत होता . नात्यातील नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वसतिगृह व्यवस्थापन आणि शयनगृहातील कर्मचाऱ्यांनी अॅलेसचा मृतदेह बाथरूममध्ये लटकलेला पाहिला, त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी टाऊनशिप रुग्णालयात पाठवले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ॲलेस डेथ आणि व्हॉट आय डू? असं मृत अँलेसच्या हातावर लिहिलेले असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाच्या तपासणीला सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.