NDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा
देश बातमी

NDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा

ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रवीश कुमार यांचे प्राइम टाइम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे टेलिव्हिजन न्यूज शो प्रसिद्ध आहेत.

एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आल्यानंतर एनडीटीव्हीच्या संचालक मंडळातून प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला आहे.

त्यानंतर आता रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. रवीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून एनडीटीव्हीशी संलग्न आहेत. त्यांना पत्रकारितेसाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.

रवीश कुमार कोण आहेत?
रवीश कुमार यांना एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीचा प्रमुख चेहरा मानलं जातं.

रवीश यांना जेव्हा 2019 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता तेव्हा मॅगसेसेच्या वेबसाइटने म्हटलं होतं की “गेल्या काही वर्षांत भारतामध्ये स्वतंत्र पत्रकारितेचं अवकाश कमी होत चाललं आहे.”

गसेसेनी म्हटलंय “रवीश कुमार हे सामाजिक मुद्द्यांना उचलून तथ्यांसहित, वस्तूनिष्ठपणे सभ्य शब्दांत आपले विचार आपल्या शोमधून मांडतात.”

“रवीश हे आपल्या न्यूजरुमला जनतेची न्यूजरूम संबोधतात आणि ते सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधतात.”

“जर तुम्ही जनतेचा आवाज झाला तर तुम्ही पत्रकार आहात अशी व्याख्या रवीश कुमार करतात आहे,”असं वर्णन मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावर आहे.