अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारतात कोरोग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील २४ तासांत जगातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. २४ तासांच्या कालावधीत मृतांचा आकडा अडीचशेने वाढला आहे. मागील २४ तासांत ८९ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ४४ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या कालावधीत देशात ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात ६ लाख ५८ हजार ९०९ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तुलनेत अमेरिकेत 70,024 नव्या कोरोनाग्रस्तांची तर ब्राझीलमध्ये 69,662 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. काल नोंद झालेल्या कोरोनाग्रस्तांच्या यादीत अनुक्रमे भारत, अमेरिका आणि ब्राझील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होते.

देशात गुरूवारी ८१ हजार ४६६ रुग्ण आढळून आले होते. तर ४६९ जणांचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी ७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच २४ तासांच्या कालावधीत मृतांची संख्येत २५० ने वाढ झाली आहे. गुरुवारी झालेली रुग्णवाढ मागील सहा महिन्यातील उच्चांकी वाढ होती. त्यानंतर हा उच्चांकही मोडीत निघाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.