‘या’ तारखेपासून FASTAG बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा
देश बातमी

‘या’ तारखेपासून FASTAG बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून FASTAG असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींना ही घोषणा केली आहे. FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील, असे ते म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेळखाऊ प्रक्रियेवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वाहनांसाठी FASTAG लावणे आणि बंधनकारक करणे याबाबतच्या हालचाली केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून सुरू झाल्या होत्या. परंतु, FASTAGची संख्या आणि देशात असलेल्या वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना FASTAG लावणे शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाहनधारकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, आता नव्या वर्षापासून मात्र प्रत्येक वाहनाला FASTAG असणं बंधनकारक असणार आहे. १ डिसेंबर २०१७ च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही FASTAG बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

FASTAG साठी आवश्यक कागदपत्र
वाहनाचं नोंदणीचं पत्र
वाहनाच्या मालकाचा फोटो
KYCसाठी आवश्यक कागदपत्र
वास्तव्याचा दाखला