धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
बातमी मुंबई

धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

कल्याण (मुंबई) : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले असताना आपल्या आजूबाजूला अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. पण कल्याणमधील पिता-पुत्र असलेल्या दोन डॉक्टरांचाच कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ. नागेंद्र भूषण मिश्रा (५५), डॉ. सूरज नागेंद्र मिश्रा (२८) अशी निधन झालेल्या डॉक्टर पिता-पुत्रांची नावे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. नागेंद्र यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. नागेंद्र हे खडवली येथे, मुलगा डॉ. सूरज हे बापगाव येथे दवाखाना चालवित होते. कोरोना काळात ते गेल्या वर्षीपासून समर्पित भावनेने रुग्ण सेवा देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

डॉ. सूरज यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह झाला होता. कल्याणमधील काही सामाजिक संस्थांशी डॉ. नागेंद्र यांचा संबंध होता. दोन्ही डॉक्टरांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.