काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात
देश बातमी

काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झालेली पाहायला मिळाली. बुधवारी पहिल्यांदाच कपात होऊन पेट्रोलचे दर लिटरला १८ पैशांनी, तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तेलाचे आंतरराष्ट्रीय दर प्रथमच कमी झाल्याने ही कपात झाली आहे. या कपातीमुळे बुधवारपासून मुंबईतील पेट्रोलचे दर ९७.५७ रुपयांवरून ९७.४० रुपये, तर डिझेलचे दर ८८.६० रुपयांवरून ८८.४२ रुपये झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर सध्याच्या ९१.१७ रुपयांवरून ९०.९९ रुपये, तर डिझेलचे दर ८१.४७ रुपयांवरून ८१.३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. संपूर्ण देशभरात हे दर कमी करण्यात आले असून, स्थानिक कररचनेुसार ते वेगवेगळे आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात इंधनाच्या दरांमध्ये झालेली ही पहिलीच कपात आहे. यापूर्वी १६ मार्च २०२० रोजी अशाप्रकारे दरकपात करण्यात आली होती.

गेल्या वर्षात इंधनांच्या दरांत विक्रमी वाढ होऊन पेट्रोलचे दर लिटरमागे २१.५८ रुपयांनी, तर डिझेलचे दर लिटरमागे १९.१८ रुपयांनी वाढले. राजस्थान, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांतील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. मात्र फेब्रुवारी अखेरीस पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळ यांसह पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून हे दर स्थिरावले होते.