सॅनिटायझर पिऊन केली नशा; ३ भावांचा मृत्यू
देश बातमी

सॅनिटायझर पिऊन केली नशा; ३ भावांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन भावांचा मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये लॉकडाऊन सुरु असून दारू विकत घेऊ शकत नव्हते, म्हणून तिघांनी ही त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी सॅनिटायझरचा 5 लीटर कॅन विकत घेतला आणि तो पिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, मृत व्यक्ति परवत अहिरवार आणि भाऊ भूरा अहिरवार हे दोघेही कामगार होते, तर राम प्रसाद हा पेन्टर होता. हे तिघेही विवाहित होते, परंतू ते आपल्या कुटूंबापासून दूर राहत होते. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रविवारी या तिघांनी 5 लिटर सॅनिटायझरचा कॅन विकत घेतला आणि त्यातील निम्म्या सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर सॅनिटायझर प्यायल्यानंतर लवकरच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या दिवशी खराब परिस्थिती असतानाही दारुच्या हव्यासापोटी त्यांनी सोमवारी पुन्हा सॅनिटायझरचे सेवन केले.

सोमवारी रात्री घरी उशीरा राम प्रसाद आपल्या घरी जहांगीराबाद येथे गेला असल्याने त्याचा मृतदेह उशीरा मिळाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी इतर दोन जण एमपीनगरमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. स्थानिकांनी त्यांची वाईट अवस्था पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जेपी रुग्णालयात त्यांना दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.