बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या विनोदानंद झा यांचे निधन
देश बातमी

बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या विनोदानंद झा यांचे निधन

मुंबई : बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या आणि नेहमी बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या विनोदानंद झा उर्फ स्वामी ओम यांचे दिर्घ आजारानं निधन झालं आहे. गाजियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती. त्यानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर स्वामी ओम यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यातच त्यांना इतर आजारानींही जखडलं होते. मात्र, बुधवारी तीन जानेवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील निगम बोध घाटावर स्वामी ओम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वामी ओम यांनी बिग बॉस-१० च्या पर्वात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत स्वामी ओम यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये आणि कृत्य केली होती. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. आपल्या विकृत अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ओम स्वामी यांना बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर सलमानला कानाखाली लगावल्याचेही म्हटलं होतं. शिवाय बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी सलमानसह बिग बॉसमधील सहकाऱ्यांवर उलट सुलट बोलणी केली होती.

देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता. त्याचबरोबर दिल्लीत नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वामी ओम यांना मारहाण झाली होती. २००८ मध्ये स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांच्या भावानेच सायकल चोरल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.