लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट
बातमी मराठवाडा

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; माजी खा. सुनिल गायकवाड यांना डि.लिट

लातूर : लातूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. लातूरचे माजी खासदार डॉ. सुनिल बलिराम गायकवाड यांना ऑनरी D.Litt & D.Sc या दोन पदवी कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी, किंग्डम ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. २७ जनेवारीला गुडगाव दिल्ली येथिल हॉटेल लीला ऐम्बिअन्स येथे हा सन्मान सोहळा होणार असून ही बाब लातूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. सुनिल गायकवाड हे २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर मतदारसंघातून निवडून लोकसभेवर निवडून गेले होते. लॉर्डबुद्धा अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार, बांगलादेश या पुरस्काराने गौरवलेले ते एकमेव भारतीय खासदार आहेत. त्यांना सांसद रत्न पुरस्कार तसेच अनेक पुरस्कारानी त्यांचा गौरविण्यात आलेले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते जनसंवाद हे त्यांचे हिन्दी पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. ते १६ व्या लोकसभा मधे १००% उपस्थिती आणि सर्वाधिक शैक्षणिक डिग्री असलेले खासदार म्हणूनही परिचित आहेत. भारत सरकारचे दोनवेळा त्यांनी परदेशात प्रतिनिधित्व केले. सुनील गायकवाड यांच्या वडिल बळिराम गायकवाड यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चळवळीत कामे केलेले आहे.