गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती
पुणे बातमी

गिरीश प्रभूणे यांच्या संस्थेला पाठवलेल्या नोटीसीला स्थगिती

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीस प्रकरणी विधानभवनात बैठक पार पडली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलवली होती. यावेळी गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीची नोटीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील गुरुकुलम संस्थेला जप्तीची नोटीस बजावली होती. पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा 1 कोटी 86 लाखाचा कर थकल्याने हि नोटीस बजावण्यात आली होती. विशेष बाबा म्हणजे पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेले ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना नुकतंच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. त्यामुळे एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा काहीशा अवस्थेला गिरीश प्रभुणे यांना सामोरं जावं लागलं होतं.

याप्रकरणी तात्काळ तोडगा काढण्याचं निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत या नोटीसला स्थगिती देऊन कर कमी आकारण्याची सूचना त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला केली. ”निळ्या पूररेषेतून गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेची बांधकामे वगळण्याची सूचना जलसंधारण खात्याला दिली आहे. मुख्य कर जेवढा कमीत कमी आकारता येईल तेवढा कमी कर आकारावा. पुलाच्या बांधकामासाठी एक शाळा पाडली जाणार आहे, त्यासाठी पर्यायी जागा द्यावी. शाळेच्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व परवानग्या पिंपरी चिंचवड महापालिका देणार असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

तर, “दोन संस्थांना जी नोटीस दिली आहे, त्याची फेरपडताळणी करण्यात आली. त्यांना हा कर भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल. योग्य करनिर्धारण केलं जाईल, त्यामुळे कर कमी होईल,” अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.