धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. परंतु, महाराष्ट्रात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.