आता केंद्राकडून राज्यांना रेमडेसिवीर मिळणार नाहीत; वितरण थांबलं!
देश बातमी

आता केंद्राकडून राज्यांना रेमडेसिवीर मिळणार नाहीत; वितरण थांबलं!

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाटेत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार वाढला होता. उत्पादन घटल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत होती. मात्र, आता केंद्र सरकारने राज्यांना थेट कंपनीकडून इंजेक्शन खरेदी करावे असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मला तुम्हाला सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन दहा पटीने वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं. ११ एप्रिल २०२१ रोजी दररोज ३३ हजार इंजेक्शनची निर्मिती होत होती. आता हेच उत्पादन साडे तीन लाखांपर्यंत पोहोचलं आहे, असं ट्वीट मनसुख मंडाविया यांनी केलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणारे कारखाने २० होते. त्यानंतर आता ही संख्या ६० वर पोहोचली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अंसही त्यांनी सांगितलं. तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग एजेंसी आणि सीडीएससीओला रेमडेसिवीरच्या उपलब्धेवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.