सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर
देश बातमी

सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिली आहे. यासोबत लशीच्या एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असेल. अशी माहितीही सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी’ आणि “ऍस्टाझेनेका’ यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील “एसआयआय’मध्ये विकसित झालेल्या “कोव्हिशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या “सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन”ने1 जानेवारीला परवागनी दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर “एसआयआय’ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. प्रत्यक्षात 11 कोटी लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती “एसआयआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. लसीच्या वाहतुकीसाठी सज्ज सीरम इंस्टिट्यूटकडून लसीच्या वाहतुकीसाठीची देखील तयारी पूर्ण झाली आहे. कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी देशाच्या कानाकोपऱ्या लशीची वाहतूक करणार आहे. सीरम इंस्टिट्यूटबाहेर कोल्ड स्टोरेज वाहनं देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.