मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता
देश बातमी

मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, याबाबत एक दिलासादायक बातमी असून लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेची शुक्रवारी लखनौमध्ये बैठक होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या या 45 व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल जवळपास 75 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, पेट्रोल आणि डिझेल वरील कर हे राज्याच्या प्रमुख उत्पादनाचे साधन असल्यानं राज्य सरकार याला विरोध करण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आल्यास महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वरील मंत्र्यांचे पॅनेल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करू शकते. राज्य सरकारांची भूमिका योग्य राहिल्यास इंधन दर कपातीचा मोठा निर्णय होऊ शकतो.

पेट्रोलचा दर होऊ शकतात 75 रुपये
पेट्रोलियम उत्पादन जीएसटीच्या कक्षेत आणलं गेलं तर केंद्र आणि राज्याच्या महसूलात जीडीपी केवळ 0.4 टक्के म्हणजे 1 लाख कोटी रुपये कमी होतील. जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणलं गेले तर देशभरात पेट्रोल 75 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 68 रुपये प्रति लीटर या दराने विक्री केले जातील, असे गेल्या मार्च महिन्यात एसबीआयच्या आर्थिक सर्वेक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात सांगितले होते.