पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..
देश बातमी

पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कृषी कायद्याविरोधात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यास केंद्रसरकार नकार देत आहे. तर दुसरीकडे, जनतेचे लाक्ष वेधण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या उलट भाजपकडून शेतकरी परिषदा आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, आता सतलज यमुना लिंक कालव्याच्या मुद्यावरून आता हरियाणामध्ये राजकारण सुरू झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात उपोषणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सतलज यमुना लिंक कालवा प्रश्नावर फतेहाबादमध्ये आज भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी शनिवारी एक दिवसाचे उपोषण केले. . ज्याचा शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबादमध्ये भाजप नेते व कार्यकर्ते उपोषणाला बसलेले असताना त्या ठिकाणी काही शेतकरी पोहचले आणि त्यांनी पोलिसांनी लावलेली बॅरिकेड तोडली. या वेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी भारत माता की जय आणि नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या घोषणाबाजी केली. हातात काळे झेंडे घेऊन शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेतकर्‍यांचा विरोध पाहून उपोषणाला बसलेले नेते व कामगार यांना तेथून पळ काढावा लागला.

खरतर, जेव्हा आंदोलनकरते भाजपा नेते व शेतकरी यांच्यात तणावग्रस्त वातावरण झाले. त्यावेळी पोलिस दल आणि अधिका्यांनी घटनास्थळावर दोघांच्या दरम्यान बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त शेतक्यांनीही पोलिसांचे एकही म्हणणे न ऐकता भाजप नेत्यांचे तंबू उखडून फेकून दिले.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भारतीय जनता पक्षाचे नेते उपोषण करून शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. प्रशासनाने या उपोषणाच्या कार्यक्रमासाठी भाजप नेत्यांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, शेतकर्‍यांवर लाठीचार्ज व अश्रुधुर सोडण्यात आले होते. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.