अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
पुणे बातमी

अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार

पुणे : अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ मार्चला अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी शहरासह आसपासच्या उपनगरातून अनेक भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र शहरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रस्टने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत माहिती देताना अशोक गोडसे यांनी सांगितले की, ”अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद राहणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र भाविकांसाठी ट्रस्टने पर्यायी व्यवस्थाही केली आहे. अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे.

भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी. घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/

Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
त्याचबरोबर, मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे. तसेच, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्विकारणे बंद केले आहे. तसेच येणा-या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे.