बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड
देश बातमी

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथकाणे धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रॉबर्ट वाड्रा यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी दाखल झाले असून त्यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे वाड्रा हे आयकर विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले नव्हते. बिकानेर आणि फरिदाबाद येथील जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील सुखदेव विहार येथील वाड्रा यांच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे.

आरोपांनुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या फर्म सनलाइट हॉस्पिटॅलिटीने राजस्थानमधील बीकानेरमध्ये जमीन घोटाळा केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने 69.55 हेक्टर जमीन 72 लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर अ‍ॅलेगेनी फिन्लेसला 1.15 कोटी रुपयांना विकली. म्हणजेच या व्यवहारातून फर्मने 4.43 कोटी रुपयांचा नफा कमवला.

तसेच, लंडनस्थित मालमत्ता खरेदीसाठीदेखील रॉबर्ट वाड्रावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. लंडनमधील ही संपत्ती संजय भंडारीने 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी केली होती आणि 2010 मध्ये तेवढ्याच किंमतीला विकली. तर दुसरीकडे याच संपत्तीच्या डागडुजी आणि इतर कामावर 65 हजार पाऊंडचा खर्च करण्यात आल्याचं बोललं जातं. तरीही खरेदी केलेल्या रक्कमेतच ही संपत्ती रॉबर्ट वाड्रा यांना विकण्यात आली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे.

लंडनमधील ब्रायंस्टन स्क्वेअर येथील एका संपत्तीच्या खरेदीत मनी लाँड्रिंगच्या आरोपांसंबंधी हे प्रकरण आहे. ही संपत्ती 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि या संपत्तीचे मालक रॉबर्ट वाड्रा असल्याचा दावा केला जातोय. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सध्या फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीची चौकशी सुरु आहे. याच चौकशीतून मनोज अरोराचीही भूमिका समोर आली, ज्याच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.