वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर
राजकारण

वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत एक दिवस आधीच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते. तसेच कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्या आजच ईडीच्या कार्यालयात हजर झाल्याने सर्वांच धक्का बसला आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच जबाब नोंदवण्यात आले असून, फक्त वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे.