देशात कोरोनाचे तांडव; सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे तांडव; सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेनं सौम्य ठरवली असून, देशात दररोज चार लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.

तत्पूर्वी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक थांबवण्यासाठी उशिराने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचं दृश्य देशभरात दिसत आहे. उद्रेक झाल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी कोरोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. देशात करोनाचा प्रकोप सुरू असल्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे.