दिलासादायक! देशात ४ महिन्यांतील निचांकी कोरोनाबाधितांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात ४ महिन्यांतील निचांकी कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. सध्याची आकडेवारी पाहता देशवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासांत दिवसभरात गेल्या ४ महिन्यांतील सर्वात कमी बाधित आढळले तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात काल दिवसभरात ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या ११८ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे. गेल्या १०९ दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर देशात काल दिवसभरात एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बर होण्याचा दर आता ९७.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. देशात काल दिवसभरात २०२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता ४ लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे. तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

लसीकरण
देशात काल दिवसभरात ४० लाख ६५ हजार ८६२ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी २५ लाख ५८ हजार ८४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १५ लाख ७ हजार १७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ झाली आहे.