दिलासादायक! एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची नोंद; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! एप्रिलनंतर सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची नोंद; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मागील २४ तासांत ८४ हजार ३३२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर १ लाख २१ हजार ३११ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ४ हजार ००२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या ही मागील ७० दिवसांमधील निच्चांकी संख्या ठरली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ झाली असून, २ कोटी ७९ लाख ११ हजार ३८४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आजपर्यंत देशात ३ लाख ६७ हजार ०८१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १० लाख ८० हजार ६९० असून आजपर्यंत २४ कोटी ९६ लाख ३०४ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.

दरम्यान, देशामध्ये करोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच अनेकदा लसी वाया गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या अनेक लसी न वापरताच वाया गेल्या आहेत. देशभरामध्ये वाया गेलेल्या लसींची संख्या लाखांच्या घरांमध्ये आहे.