देशात एका दिवसांत ३ लाख ४३ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात एका दिवसांत ३ लाख ४३ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. तर ४००० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांपेक्षा अधिक म्हणजेच ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तर आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७ लाख ०४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७ कोटी ९२ लाख ९८ हजार ५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.