दिलासादायक! देशात महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. त्यानंतर दिलासादायक आकडेवारी समोर आली असून महिन्यात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही २६ लाखांच्या खाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील मृतांची दररोजची सरासरी देखील खाली येताना दिसत असून, एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तीन हजार ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे सोमवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी झाली आहे.

त्याचबरोबर, तीन लाख २६ हजार ८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ५११ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख ७ हजार २३१ वर पोहोचली आहे.